Breaking news

टायगर पाॅईटवर भाडणं करणार्‍य‍ांना न्यायालयाकडून दहा हजारांचा दंड

लोणावळा : पर्यटनाचे महत्वाचे ठिकाण असलेल्या टायगर पाॅईट येथे दुकानावर गिर्‍हाईक बोलविण्याच्या कारणावरून हाणामारी करणे हाॅटेल टपरी व्यावसायकांना चांगलेच महागात पडले आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करत पाच जणांना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने प्रत्येकी दोन हजार प्रमाणे त्यांना दहा हजार रुपयांचा दंड केला आहे.

    आतवण ता. मावळ हद्दीमध्ये टायगर पॉईंट येथे 5 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास अक्षय किसन मोरे, रोहित किसन मोरे, कौशल संगम बनसोडे, नितीन बबन झोरे, विकास बबन आखाडे या हॉटेल टपरी चालकांमध्ये टपरीवर गिर्‍हाईक बोलविण्याच्या कारणावरून भांडणे झाली होती.  

     भांडणामध्ये लाठ्या काठ्याचा वापर झाला होता व सार्वजनिक ठिकाण असलेल्या टायगर पाॅईटवर दांडगाई करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असल्याने लोणावळा ग्रामीण पोलिसांनी स्वतःहून याप्रकरणाची दखल घेत गुन्हा दाखल केला होता. वरील युवकांनी प्रथम हाणामारी केली, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आले व नंतर आमचं परस्परात मिटलं आहे असे सांगत तक्रार नाही असे सांगितले. मात्र घटनेचे गांभीर्य ध्यानात घेत या युवकांमध्ये परत भांडणं होण्याची शक्यता ध्यानात घेत लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सदरचा गुन्हा दाखल केला होता.

    सार्वजनिक शांततेचा भंग करत दांडगाई व दहशत निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न केला अथवा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांनी दिला आहे. तसेच कोणी अशी दांडगाई करत अवैध व्यावसाय करत असल्यास लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन मोरे यांनी केले आहे.

    पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने, पो. हवा. युवराज बनसोडे, पो. कॉ. संदिप बोराडे, पो. कॉ. ऋषिकेश पंचरास, पो. कॉ. सिध्देश शिंदे यांनी वरील कारवाई केली आहे. 

इतर बातम्या