Breaking news

Accident News : वलवण गावाजवळ अज्ञात वाहनांला टेम्पोची धडक; चालकाचा मृत्यू

लोणावळा : जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वलवण गावाच्या हद्दीत समोर जाणार्‍या अज्ञात वाहनांला मागून टेम्पोने जोरदार धडक दिली. या धडकेत टेम्पो चालकाचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सिध्दप्पा गुरुपाद कुल्लुर (वय- 40, रा.साईनगर मामुंडी देहुरोड पुणे) असे या मयत चालकाचे नाव आहे. सिध्दप्पा कुल्लुर हे त्याचे ताब्यातील टेम्पो MH-14 FT-1057 घेऊन मुंबईकडून पुण्याकडे जात असताना लोणावळा येथील वलवण ब्रीज जवळ त्यांची समोर जाणार्‍या कोणत्यातरी अज्ञात वाहनाला मागून धडक बसल्याने ते गंभीर जखमी होवून मयत झाले. या अपघाताच्या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश बावकर हे करत आहेत.

इतर बातम्या