Breaking news

7 आँक्टोबरला घटस्थापनेच्या मुर्हतावर राज्यातील मंदिरे उघडणार

मुंबई : राज्यातील कोरोना संकट नियंत्रणात आल्यानं ठाकरे सरकारनं निर्बंध हळूहळू शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. 4 ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर आता मंदिरं उघडण्याची घोषणा देखील करण्यात आली आहे. सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळं 7 ऑक्टोबरपासून खुली करण्यात येणार आहेत. 7 ऑक्टोबरला घटस्थापना आहे. त्यामुळेच प्रार्थनास्थळं उघडण्यासाठी हा दिवस निवडण्यात आला आहे.

    नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे 7 ऑक्टोबर पासून राज्यातील सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं आजच घेतला. 

   अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मंदिरं खुली करण्याची सुबुद्धी सुचली, असा खोचक टोला भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला. मंदिरं उघडण्याची मागणी भाजपनं सातत्यानं लावून धरली आहे. पण मुख्यमंत्री अहंकारातून सगळे निर्णय घेतात. मंदिरं उघडायचीच आहेत ना, मग त्यासाठी 7 ऑक्टोबरपर्यंत का थांबतात. आजचं उघडा ना, असं भातखळकरांनी म्हटलं.

इतर बातम्या