Breaking news

Maval News : घाटेवाडी (वडेश्वर) येथे मंदिर पुर्ननिर्माण व मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोहळा संपन्न

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील घाटेवाडी (वडेश्वर) येते मंदिर पुर्ननिर्माण व मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोहळा संपन्न झाला. परतीच्या पावसात रमा एकादशी च्या रात्रीला घाटेवाडी येथील मंदिरात वीज पडल्याने श्री पांडुरंग व रुख्मिणी माता यांच्या मूर्ती भंग झाल्या तसेच मंदिर चे नुकसान झाले होते. ग्रामस्थांनी एकजुटीने व दानशूर व्यक्तीच्या माध्यमातून मंगळवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी मूर्तीची मिरवणूक व पूजा व सायंकाळी 7 ते 9 हभप श्री पांडुरंगजी शास्त्री महाराज यांचे कीर्तन झाले.

 दिनांक 30 रोजी बुधवारी सकाळी 7. 45 मिनिटांनी विधीवद पूजा होऊन श्री विठ्ठल व रुख्मिणी माता ची प्राणप्रतिष्ठा व नंतर वैराग्य मूर्ती श्री शंकरबाबा मराठे यांच्या हस्ते कळस पूजन व कळस रोहन झाले. तर प्राणप्रतिष्ठा कीर्तन रुपी सेवा सतिश महाराज काळजे यांची झाली. यावेळी गावाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व ग्रामस्थांनी मंदिर निर्माण साठी मोलंच सहकार्य केलेल्या सर्व मान्यवर चे सुदर्शन तरुण मंडळ च्या वतीने मनःपूर्वक आभार व ऋण व्यक्त केले.

इतर बातम्या