Breaking news

Talegaon News : वक्ता म्हणजे जगज्जेता; या मोफत संवाद कार्यशाळेचा तळेगावात शुभारंभ

तळेगाव दाभाडे : कै. सतीश काका खळदे प्रतिष्ठानच्या वतीने वक्ता म्हणजे जगज्जेता या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. याप्रसंगी बोलताना मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे म्हणाले खळदे कुटुंबांचे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान आहे. कै. सतीश खळदे यांच्या पावलावर पाऊल टाकून समाजासाठी संकेत काम करत आहे. उद्योजक सुधाकर शेळके म्हणाले, भाषण कसे करावे ही कार्यशाळा मोफत चालू केली याचा सर्वांनी लाभ घ्यावा. रंजनाताई भोसले यांनी सतीश काकांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. पुणे मुंबई या ठिकाणी वक्तृत्व कलेसाठी लोक पैसे भरून कला आत्मसात करतात. असा कार्यक्रम सतीश काका खळदे प्रतिष्ठानने व कुटुंबाने मोफत राबवला असून समाजासाठी ही चांगली गोष्ट आहे. बोलेल त्याची माती विकली जाते आणि जो बोलत नाही त्याचे सोने ही विकले जात नाही. यासाठी आपले विचार लोकांसमोर प्रकट करता आले पाहिजे असे मान्यवरांनी सांगितले.

      याप्रसंगी भूषण खळदे, राजेश करंडे, हर्षद पवार, महेश कदम, योगेश चौधरी, चिराग खळदे, सौरभ खळदे, ओमकर खळदे, महेश खळदे, संदीप खळदे, मुन्ना मोरे, अभय देवकर, पार्थ बवले, अजय बवले, सागर दिघे, अतुल देशपांडे, केदार शिळीमकर, वैशाली खळदे, संगीता खळदे, शैलजा खळदे, पूनम खळदे, स्वाती खळदे, पूजा खळदे, मेघा खळदे, अश्विनी खळदे, प्रशांत गायकवाड, मंदार करंडे, नितिन खळदे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमर(जितू) खळदे यांनी केले तर सूत्रसंचालन विशाल मोरे यांनी केले. नितीन फाकटकर यांचे व्याख्यान झाले व आभार संकेत खळदे यांनी मानले. 

इतर बातम्या