Breaking news

T20 World Cup Trophy l भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी लाखोंचा जनसमुदाय मुंबईत उपस्थित

मावळ माझा न्युज नेटवर्क : भारतीय क्रिकेट संघाने तब्बल तेरा वर्षांनी वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकली आहे. टीम इंडियाने T 20 विश्वचषकाच्या फायनल मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघावर रोमहर्षक रित्या विजय मिळवत विश्व विजेता होण्याचा मान मिळवला आहे शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारतीय खेळाडूंनी अतिशय संयमाने खेळत व चातुर्य दाखवत दक्षिण आफ्रिका संघाचा सात धावांनी पराभव केला. आणि सतरा वर्षानंतर पुन्हा विश्वचषकाची ट्रॉफी ही मायभूमी मध्ये आणली. भारतीय क्रिकेट संघ ही ट्रॉफी घेऊन आज भारतामध्ये दाखल झाला. मुंबईमध्ये दाखल झालेल्या या संघाच्या स्वागतासाठी लाखोंचा जनसमुदाय रस्त्यावर उपस्थित होता पुढील काही वर्ष क्रिकेट प्रेमींनी केलेली ही गर्दी व मुंबईचे रस्ते हे डोळ्यासमोरून दूर होणार नाहीत असा हा अतिशय हर्षमय क्षण मुंबईकरांनी अनुभवला.

     ओपन डेक बस मध्ये भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार रोहित शर्मा खेळाडू विराट कोहली व इतर सर्व खेळाडूंनी विश्वचषक उंचावत चहात्यांना अभिवादन केले. भारतीय संघ मुंबई विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांना ठरल्याप्रमाणे नरिमन पॉईंट रोडवर आणण्यात आले. तेथून मरीन ड्राईव्ह येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार रोहित शर्मा यांनी क्रिकेट प्रेमींना मरीन ड्राईव्ह व वानखेडे स्टेडियम या ठिकाणी येण्याचे आवाहन एक्स द्वारे केले होते त्याला क्रिकेट प्रेमींनी जबरदस्त प्रतिसाद दिला. भारतीय क्रिकेट संघाने अंतिम सामन्यांमध्ये अतिशय जोरदार सुरुवात केली. मात्र रोहित शर्मा व त्यानंतरचे दोन विकेट्स गेल्यानंतर विराट कोहली यांनी काहीशी संयमाची भूमिका घेत एक कसलेल्या खेळाडू प्रमाणे खेळी करत संघाची धावसंख्या 176 वर नेऊन ठेवली होती. दक्षिण आफ्रिकेने देखील जोरदार सुरुवात करत रणांची धावसंख्या गाठण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या चार षटकांमध्ये भारतीय संघाने उत्तम कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा वारू रोखत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. तब्बल तेरा वर्षानंतर भारत टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये विश्व विजेता बनला आहे. या विजयाचा सर्वत्र जल्लोष साजरा केला जात आहे.

इतर बातम्या