Breaking news

हरवलेल्या मुलीला आईच्या ताब्यात देण्यात रेल्वे यंत्रणेला यश

खोपोली (प्रतिनिधी) : कर्जत स्थानकावरून सीएसटी कडे निघालेल्या एका लोकल ट्रेनमध्ये अंबरनाथला दोन महिला आपापल्या मुलांना घेऊन लोकलमध्ये चढत असताना त्यांच्या हातून एक मुलगी अंबरनाथ स्टेशनवर राहून गेली. आई दिसत नाही असे पाहून ती मुलगी रडू लागली. अपघातग्रस्तांच्या मदतीला या अभियानातील रेल्वे कर्मचारी शशी धुळे आणि इतर कर्मचारी वर्गाने या गोष्टीची दखल घेतली. प्रसंगावधान राखून लागलीच लोकलच्या मार्गावरील सर्व स्थानकावर निवेदन प्रसारित करण्यात आले. उल्हासनगर येथे या मुलीच्या आईचा संपर्क झाला. मुलीची आई आणि तिचा मामा अंबरनाथ स्टेशनमध्ये येऊन त्या मुलीला ताब्यात घेण्याची प्रोसिजर केली.

    आज त्या लहानगीचे आणि तिच्या आईचे नशीब बलवत्तर म्हणून शशी धुळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची मदत मिळाली म्हणून मोठी दुर्घटना टळली. अंबरनाथ रेल्वे स्टेशन मास्टर, रेल्वे पोलीस, आणि होमगार्ड यांच्या माध्यमातून हे सोपस्कार पूर्ण झाले.

इतर बातम्या