Breaking news

LONAVALA RASTA ROKO : लोणावळ्यात मंगळवारी टपरीधारक, रिक्षा, टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने रास्ता रोको

लोणावळा : लोणावळा शहरात मंगळवारी (दि.12) आमदार सुनिल शेळके यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नगरपरिषद प्रशासन व पोलीस खात्याच्या दडपशाही विरोधात लोणावळ्यातील टपरीधारक, टॅक्सी, रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

    लोणावळा हे पर्यटन स्थळ असल्याने येथील अनेक स्थानिक नागरिक टॅक्सी, रिक्षा चालवून तसेच रस्त्यालगत छोट्या टपऱ्या चालवून मागील अनेक वर्षांपासून आपली उपजीविका करत आहेत. तेच त्यांचे उपजीविकेचे प्रमुख साधन बनले आहे. त्यात मागील दिड दोन वर्षाच्या काळात लॉकडाऊन मुळे या छोट्या व्यासायिकांवर उपासमारीची वेळ आली. आणि आता लॉकडाऊनचे नियम शिथिल केले असताना स्थानिक नगरपरिषद प्रशासन टपरीचालकांना त्रास देत आहे, अशा स्थानिकांकडून तक्रारी येत आहेत.

तसेच स्थानिक रिक्षा व टॅक्सीवाले पर्यटनाच्या माध्यमातून टॅक्सी व रिक्षा चालवून आपली उपजीविका करत असताना ओला व उबेर सारख्या कंपन्यामुळे त्यांना ग्राहक मिळत नाहीत. यामुळे या ओला उबेर कंपन्यांना  लोणावळ्यात विरोध करणाऱ्या रिक्षा व टॅक्सी चालकांवर पोलीस दडपशाही करत असून त्यांच्या या दडपशाही विरोधात आमदार सुनिल शेळके यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि.12) रोजी सकाळी 11 वाजता जुना मुंबई पुणे महामार्गावर कुमार रिसॉर्ट चौकात आंदोलन करण्यात येणार आहे.

इतर बातम्या