Breaking news

LONAVALA BAND : लोणावळ्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; बाजारपेठ कडकडीत बंद

लोणावळा : लखीमपुर येथील शेतकरी नरसंहार व केंद्राने शेतकरी विरोधी केलेल्या जुलमी कायदे, वाढती महागाई, बेरोजगारी याविरोधात महाविकास आघाडीने आज जाहिर केलेल्या महाराष्ट्र बंदला लोणावळा शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोणावळा बाजारपेठेतील सर्व व्यावहार कडकडीत बंद ठेवत व्यापारी वर्ग, भाजी विक्रेते या सर्वांनी बंदला पाठिंबा दिला.

    महाविकास आघाडी लोणावळा शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी राम मंदिर गवळीवाडा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान पायी मोर्चा काढत त्याठिकाणी केंद्रातील भाजपा सरकारचा निषेध नोंदविला. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी भाषणं करत मोदी सरकारचा व शेतकर्‍यांना मोटारी खाली चिरडणार्‍या उत्तरप्रदेश येथील गृहमंत्र्याच्या मुलाचा निषेध नोंदवत त्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. 

    उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर इन्कमटॅक्स विभागाने टाकलेल्या धाडीचा देखील यावेळी निषेध नोंदविण्यात आला. 

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव निखिल कविश्वर, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य बाळासाहेब पायगुडे, शिवसेना वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश केदारी, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष राजु बोराटी, काँग्रेसचे लोणावळा शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड, शिवसेना लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, राष्ट्रवादी शहराध्यक्ष जीवन गायकवाड, शिवसेना महिला संघटक शादान चौधरी, काँग्रेस गटनेत्या आरोही तळेगावकर, संध्या खंडेलवाल, कल्पना आखाडे, मनिषा भांगरे, हमाल व कष्टकरी पंचायतीचे अध्यक्ष राजाराम साबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

इतर बातम्या