Breaking news

Social Media Katta : काय सांगता... ग्रुप मध्ये कोणी शिंदे असेल तर हे करा… नाहीतर…

लोणावळा : महाराष्ट्राच्या राजकारणात भुकंप घडविणारे नाव म्हणजे एकनाथ शिंदे. शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात उघड उघड बंड पुकारत शिवसेनेला हिंदुत्व ठिकविण्यासाठी महाविकास आघाडी मधून बाहेर पडा असे आवाहन केले आहे. त्यांच्या समर्थनात शिवसेनेच व अपक्ष मिळून जवळपास 46 आमदार गुवाहाटी येथे गेले आहेत. त्यांनी दुसरा गट स्थापन करण्याची तयारी केली आहे. तसेच आपणच खरे शिवसैनिक असल्याचे सांगत गटाला देखील शिवसेना हेच नाव देण्याचा प्रयत्न सुरु आहे. शिंदे यांच्या या प्रयत्नांचा शिवसेनेच्या नेतृत्वासह सोशल मिडियाने देखील धसका घेतला आहे. सोशल मिडियावर याबाबत खरमरीत चर्चा सुरु आहे. एका नेटकर्‍याने टाकले आहे की आपल्या वाॅटसअप ग्रुप मध्ये कोणी शिंदे असेल तर त्याच्यावर नजर ठेवा नाहीतर आपली 30 - 40 सदस्य घेऊन दुसरा गट स्थापन करतील व आपलेच नाव त्या गटाला देतील. याकरिताच म्हंणतोय शिंदेवर नजर ठेवा. दुसरा म्हणतो नजर हटी आमदार गुवाहाटी, आमदार पाटलांचा डायल सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. काय झाडं…काय डोंगर…काय हाॅटेल हा डायलॉग सोशल मिडियावर भाव खाऊन गेला आहे. शिंदेच्या बंडामुळे कार्यकर्ते सावध झाले असून भावांनो निष्टा बिष्टा काही नसते, एका रात्रीत निष्टा बासनात बांधून ठेवतात, त्यामुळे नेत्यांच्या भडकावू भाषणांनी आपल्यातील नाती खराब करू नका, गुण्यागोविंदानं रहा, जिकडं खोबरं तिकडं उदोउदो सध्या राजकारणात सुरु आहे असे सल्ले देखील दिले जात आहेत. एकंदरितच काय तर शिंदे यांच्या बंडाने राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असला तरी त्या बंडामधून सोशल मिडियाला चांगलेल करमणुकीचे साधन मिळाले आहे. 

इतर बातम्या

पुणे ग्रामीण जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट इ. यांच्याकरिता सीआरपीसी कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी; पालन न करणाऱ्या आस्थपनांवर होणार कठोर कायदेशीर कारवाई