Breaking news

जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त स्माईल सायकल रॅली संपन्न

तळेगाव दाभाडे : जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन व अवैध वाहतूक विरोधी दिनानिमित्त, रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी आणि स्माईल व्यसनमुक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज स्माईल सायकल रॅली संपन्न झाली. या रॅलीची सुरुवात पोलिस आयुक्तालय पिंपरी चिंचवड येथे रोटरीचे उपप्रांतपाल, जिल्हा 313 चे, रो. गणेश कुदळे व आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या हस्ते फ्लॅग होस्टिंग करून करण्यात आली. या रॅलीत कृष्णप्रकाश हे देखील सहभागी झाले होते.

    समारोपाच्या कार्यक्रमामध्ये रोटरीचे अध्यक्ष रो. संतोष शेळके यांच्या हस्ते कृष्णप्रकाश यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मावळचे युवा उद्योजक सुधाकर शेळके यांचा सत्कार स्माईल व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष हर्षल पंडित यांच्या हस्ते करण्यात आला.    

     स्माईल व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक अध्यक्ष हर्षल पंडित यांनी आपल्या भाषणात, व्यसनाधीन तरुण ते आजचा स्माईल व्यसनमुक्ती केंद्राचा संस्थापक अध्यक्ष हा आपला जीवनप्रवास सांगितला. व्यसनाला सकारात्मक पर्याय देवून आयुष्य अतिशय सुंदर रितीने जगता येते असे मत त्यानी मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातून पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी व्यसनमुक्त रहाण्याने माणूस किती ऊंचीवर पोहचतो हे उदाहरणाद्वारे स्पष्ट केले. तसेच सर्वात जास्त गुन्हे हे व्यसनाधिन लोकांकडून होत असतात असे मत आपल्या अध्यक्षीय भाषणात मांडले.

   या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण ओस्वाल यांनी केले तर दीपक फल्ले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रशांत तायें यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थापक विलास काळोखे, दिलीप पारेख, सुरेश शेंडे, संजय मेहता, दादासाहेब उर्हे, सुनिल महाजन, रेश्मा फडतरे, शाहिन शेख, शरयू देवळे यांनी सहकार्य केले. तसेच या कार्यक्रमासाठी स्माईल व्यसनमुक्ती केंद्राचे अमोल कुलकर्णी, प्रशांत खर्जुले, राहुल केळकर, अमर रेड्डी, रोहित जोगळेकर, जयवंत कांबळे, सचिन कांबळे, जयंत खेर्डेकर, प्रकाश ढिडे, जॉय चेत्तियार आणि बाबासाहेब कांबळे व सामाजिक कार्यकर्ते मारुतीराव कारके यांची मोलाची मदत लाभली.

इतर बातम्या