Breaking news

सिद्धांत स्कूल ऑफ फार्मसी (वुमन) मध्ये राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न

वडगाव मावळ : सुदुंबरे येथील सिद्धांत स्कूल ऑफ फार्मसी (वुमन) आणि सिद्धांत कॉलेज ऑफ डी फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 23 मार्च रोजी शहीद  दिनानिमित्त राज्यस्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

      या कार्यक्रमाचे उद्घाटन मेघालयच्या महात्मा गांधी विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. सागर मांजरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. डुंबरे, प्रा. कांडेकर उपस्थित होते. कार्यक्रमाची संकल्पना आणि रूपरेखा दोन्ही महाविद्यालयाचे प्राचार्य बी.व्ही. मठदेवरु आणि सागर कोरे यांनी केली होती. सदर स्पर्धेत विविध महाविद्यालयाच्या 18 संघांनी सहभाग घेतला होता. मुलांचा बौद्धिक विकास, विज्ञान विषयाची गोडी व जिज्ञासा यासाठी अशा प्रश्नमंजुषा स्पर्धा संप्रेरक असल्याचे प्रतिपादन डॉ. सागर मांजरे यांनी उद्घाटन प्रसंगी केले. 

     सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच विजेत्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रश्नमंजुषा स्पर्धेत कु. वीर वैष्णवी व कु सोनाली पाटील यांनी प्रथम क्रमांक, कु देशमुख माधुरी व कु पवार यांनी द्वितीय क्रमांक, कु भाग्यश्री पदमने व कु सोनाली बाबर यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. प्रा.श्वेता मंत्री व प्रा.अश्विनी खेडेकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. या कायऺक्रमाचे नियोजन प्रा. श्वेता मंत्री, प्रा. अश्विनी खेडेकर, प्रा. शुभदा शिंदे, प्रा. भाग्यश्री पडवळ यांनी केले होते. प्रा. श्रेया गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.

इतर बातम्या