Breaking news

तळेगाव येथील निलया सोसायटी मध्ये श्रीराम नवमी उत्साहात साजरी

लोणावळा : तळेगाव दाभाडे येथील निलया सोसायटीमध्ये श्रीराम नवमी विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. 

       दुपारी बारा वाजता निलया सोसायटीमधील सर्व महिलांनी मिळून श्री रामाचा पाळणा म्हणत श्रीराम जन्माचे स्वागत केले. तसेच राम लल्लाचे दर्शन घेतले. सोसायटीतील सर्व महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांचा व नागरिकांचा जन्मोत्सव सोहळ्यासाठी उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. जन्मोत्सव सोहळ्यासाठी प्रत्येकांने योगदान दिले होते. आयोजकांनी सायंकाळी भजन व संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. श्रीराम नवमी निमित्त वाकड येथील संत श्री शिरोमणी महाराज भजनी मंडळ व सहकारी यांनी भजन व संगीत सादर करून उपस्थित राम भक्तांना मंत्रमुग्ध केले‌. संत शिरोमणी महाराज भजनी मंडळाचे संचालक राजाभाऊ भुजबळ यांचा सत्कार सोसायटीच्या वरिष्ठ नागरिकांकडून श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी निलया सोसायटीतील सर्व सभासदांचे मोलाचे सहकार्य लाभले.

इतर बातम्या