शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची गडचिरोली येथे आढावा बैठक संपन्न; आगामी विधानसभा, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीबाबत चर्चा
मावळ माझा न्युज नेटवर्क : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वात, पूर्व विदर्भ संपर्क नेते, आमदार भास्कर जाधव, पूर्व विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख महेश केदारी यांच्या अध्यक्षतेखाली, गडचिरोली विधानसभा संपर्कप्रमुख शिवाजीराव झोरे, जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमके, जिल्हाप्रमुख रियाज भाई शेख, सह संपर्कप्रमुख अरविंद कात्रटवार, माजी आमदार रामकृष्ण मडावी, जिल्हा संघटक विलास ठोंबरे यांच्या उपस्थितीत आज गडचिरोली सांस्कृतिक हॉल येथील पदाधिकारी आढावा बैठक घेण्यात आली.
या वेळेस गडचिरोली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख महेश केदारी यांनी तालुका प्रमुख व पदाधिकारी यांना परस्पर विचारणा करत तालुक्यातील विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, बुथ प्रमुख, शाखा प्रमुख यांचा आढावा घेतला. तसेच पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मार्गदर्शन केले. येणाऱ्या विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका लक्षात घेता सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमाने कामाला लागा अशा सूचना दिल्या. लोकसभेत आपण ज्या प्रमाणे काम केले त्याच पद्धतीने नियोजनबद्ध काम येणाऱ्या काळात विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती साठी सुद्धा करायचे आहे. शिवसेनेचा भगवा संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातच नव्हे तर अख्या महाराष्ट्रामध्ये फडकवायचा आहे असे प्रतिपादन केले. त्यानंतर शिवाजी झोरे विधानसभा संपर्कप्रमुख यांनी मार्गदर्शन करताना विधानसभेतील सर्व पदाधिकाऱ्यांना एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात वेळ घालवण्या पेक्षा तसेच आपसी मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येऊन पक्ष संघटना वाढवण्याकरिता गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक हा मंत्र ध्यानात ठेवून एकजुटीने काम करावे. येणाऱ्या काळात जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल त्यानंतर विधानसभा असेल या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार कसे निवडून आणता येतील याकडे लक्ष देऊन जोमाने कामाला लागावे. पक्षाचा आदेश ज्या प्रमाणे येणार त्याच प्रमाणे सर्व पदाधिकाऱ्यांना एकमेकांना सोबत घेऊन काम करण्यात यावे असे त्यांनी आपल्या भाषणात आवर्जून सांगितले.
या पदाधिकारी बैठकीचे सूत्रसंचालन भगमारे सर, उप जिल्हाप्रमुख सुनील पोडीतीवर, विधानसभा संघटक नंदू कुंबरे, तालुकाप्रमुख मनोज पोर्टे, महिला आघाडी शितल ठवरे, आरती ताई, गेडाम ताई, मंगल ताई, युवा सेना पवन गेडाम यांनी केले. यावेळेस बैठकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख, शाखाप्रमुख, महिला आघाडी, युवासेना, युवतीसेना अंगीकृत सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित होते.
त्याच प्रमाणे शिवसेनेच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा महिला व बाल रुग्णालय गडचिरोली या ठिकाणी फळ वाटप करण्यात आले.