Breaking news

शिवसैनिक शिवसेना व ठाकरे परिवाराच्या पाठीशी ठामपणाने उभे आहेत - महेश केदारी

मलकापूर : शिवसेना पक्ष हा शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार असून समस्त शिवसैनिक त्यांच्या विचारधारेवर निष्ठा ठेवून संघटनेत कार्यरत आहेत, किंबहुना शिवसैनिक शिवसेनेचा वारसा पुढे नेत असून संकटसमयी सुद्धा शिवसेनेच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत ही बाब खरोखर अभिमानस्पद आहे असा विश्वास मलकापूर विधानसभा शिवसेना संपर्क प्रमुख महेश केदारी यांनी दसरखेड येथील शिवसेना संपर्क कार्यालयात संपन्न झालेल्या आढावा बैठक प्रसंगी व्यक्त केला.

   यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख वसंतराव भोजने, तालुका प्रमुख विजय साठे, कामगार सेना तालुका प्रमुख संतोष साठे आदीं प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना महेश केदारी म्हणाले की, सद्यस्थितीत संकटाचा काळ असला तरी हा काळही निघून जाईल मात्र या परिस्थितीत शिवसैनिकांनी डगमगता कामा नये. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या असून पक्ष श्रेष्ठींच्या आदेशानुसार आपल्याला पुढील वाटचाल करायची आहे. बिकट परिस्थितीवर मात करून पुढे जायचे आहे. तरी शिवसैनिकांनी केवळ संघटना मजबुतीवर लक्ष केंद्रित करून सक्रियपणे कार्यरत रहावे असे आवाहन केले. जिल्हा उपप्रमुख वसंतराव भोजने यांनी सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक अनुषंगाने शिवसैनिकांनी सजग राहुन नियोजनबद्धतेने कार्य करावे असे आवाहन करीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तालुका प्रमुख विजय साठे यांनी घडणाऱ्या घडामोडी कडे अती लक्ष देण्यापेक्षा आगामी निवडणुकीत शिवसेनेचा भगवा कसा फडकेल या दृष्टीने शिवसैनिकांनी सज्ज राहावे असे आवाहन केले. तर कुणी कुठेही गेले तरी आम्ही मात्र शिवसैनिक म्हणून पक्षासोबतच आहोत व राहू अशी ग्वाही तालुका उपप्रमुख राजेशसिह राजपूत व विनायक जवरे यांनी आपल्या मनोगतातून दिली. संचालन तालुका उपप्रमुख राजेशसिह राजपूत यांनी केले तर आभार प्रदर्शन कामगार सेना तालुका प्रमुख संतोष साठे यांनी केले. यावेळी तालुका उपप्रमुख अनंत गायगोळ, गजानन धाडे, या पदाधिकाऱ्यांसह तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी तालुक्यातील संपूर्ण पदाधिकारी व शिवसैनिक शिवसेने सोबतच राहतील अशी एकमुखी ग्वाही विधानसभा संपर्कप्रमुख महेश केदारी यांच्या समक्ष जाहीर रित्या दिली.

इतर बातम्या