Breaking news

Maval Yuvasena : शिवसेनेच्या पाठीशी युवासेना सारखी मोठी संघटना उभी आहे - शिवभक्त विजय तिकोणे

कार्ला (प्रतिनिधी) : शिवसेनेवर आलेले संकट खरा शिवसैनिक दूर करू शकतो, शिवसेनेच्या पाठीशी युवासेना सारखी मोठी संघटना उभी आहे. युवासेना अधिकारी म्हणून शिवसेना मावळ तालुक्यातील प्रत्येक गावात व खेड्यापाड्यात घेऊन जाण्यासाठी आम्ही युवासैनिक कटिबद्ध आहोत असा विश्वास युवासेनेचे नवनिर्वाचित मावळ तालुका अधिकारी शिवभक्त विजय तिकोणे यांनी व्यक्त केला. आज दि 3 जुलै रोजी कार्ला MTDC रिसॉर्ट येथे युवासेनेच्या नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. युवासेनेचे मावळ लोकसभा विस्तारक राजेश पळसकर, पुणे जिल्हा युवासेना अधिकारी अनिकेत घुले व मावळ युवासेना अधिकारी विजय तिकोने व युवासैनिक यावेळी उपस्थित होते.

     यावेळी बोलताना राजेश पळसकर म्हणाले, महाराष्ट्रातील शिवसेनेचे बंडखोर नेते शिवसेनेला सोडून गेले असून शिवसेनेचा राजकीय संघर्ष सुरु झाला आहे. आता सामन्य व सच्चा शिवसैनिकांना विविध पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे. मावळ तालुक्यातील शिवसेना ही पक्षप्रमूख उध्दव ठाकरे यांंच्या बरोबर असून सर्वसामान्य शिवसैनिकांनी दिशाभूल करणाऱ्यांवर विश्वास ठेवू नये असे सांगितले. मावळ युवासेना नवनिर्वाचित पुणे जिल्हा युवासेना अध्यक्ष अनिकेत घुले, मावळ युवासेना अध्यक्ष विजय तिकोणे, पुणे जिल्हा युवासेना सरचिटणीस शाम सुतार यांंचा युवासेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

    यावेळी जिल्हा युवासेना प्रमुख अनिकेत घुले यांनी पुणे जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक व युवासैनिक उध्दव ठाकरे यांंच्या पाठीमागे सदैव असणार असल्याचे सांगितले. मावळ लोकसभा युवासेना विस्तारक राजेश पळस्कर, जिल्हा युवासेना अध्यक्ष अनिकेत घुले, सरचिटणीस शाम सुतार, मावळ युवासेना अध्यक्ष विजय तिकोणे, लोणावळा शहर युवासेना अध्यक्ष तानाजी सुर्यवंशी, बंटी हुलावळे, प्रतिक गरुड यांंच्यासह युवासैनिक उपस्थीत होते. तसेच या बैठकीमध्ये सावित्रीबाईं फुले पुणे युनिवर्सिटीच्या सिनेट सदस्य पदाची निवडणुक येत्या काही दिवसात होणार असून या निवडणुकीत युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे यांंच्या मार्गदर्शनाखाली लढविण्यात येणार आहे. या निवडणुकीत मतदार नोंदणी कशी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थितांचे आभार वसंत पडवळ यांनी मानले.

इतर बातम्या