Breaking news

आम्ही आईचे सेवेकरी ! आई एकवीरा देवीच्या कार्ला गडावर अहोरात्र भाविकांना सेवा देणारे सेवेकरी

लोणावळा : महाराष्ट्रातील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या कार्ला - वेहेरगाव गडावरील आई एकवीरा देवीच्या नवरात्र उत्सवात लाखो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. गडावर येणाऱ्या या भाविकांना सुलभतेने दर्शन व्हावे, याकरिता श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ, लोणावळा ग्रामीण पोलीस व पुणे ग्रामीण पोलीस दल यांच्या खांद्याला खांदा लावून अहोरात्र काम करणारे देवस्थानचे कर्मचारी हे सुद्धा देवीचे खरे सेवेकरी आहेत. नवरात्रीचे नऊ ही दिवस अहोरात्र हे कर्मचारी भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी काम करत आहेत. तसेच वर्षाचे 365 दिवस गडावर साफसफाई व इतर कामे करत परिसर निर्माण ठेवण्याचे काम करत असतात. 

     3 ऑक्टोबर रोजी घटस्थापनेने आई एकवीरा देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली. उद्या 12 ऑक्टोबर रोजी महानवमी होमाने या नवरात्र उत्सवाची सांगता होणार आहे. नवरात्रीच्या मागील आठ दिवसांमध्ये लाखो भाविकांनी आई एकवीरा देवीचे दर्शन घेतले. मागील रविवारी गर्दीने अक्षरशः उच्चांक गाठला होता. भल्या पहाटेपासून रात्रीपर्यंत गडावर भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर कार्ला फाटा ते आई एकवीरा देवीच्या मंदिर परिसरापर्यंत दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. प्रचंड मोठ्या प्रमाणात भाविक गडावर दाखल झाले होते. या येणाऱ्या प्रत्येक भाविकाला आई एकविरा देवीचे सुलभतेने दर्शन व्हावे तसेच गडावर स्वच्छता रहावी याकरिता पोलीस प्रशासन व विश्वस्त मंडळाच्या सोबत हे कर्मचारी कामाच्या वेळेचे कोणतेही बंधन न पाळत दिवस रात्र सेवा देत होते. यात्रा काळासोबतच संपूर्ण वर्षभर हे कर्मचारी आई एकवीरा देवीच्या मंदिर परिसरामध्ये साफसफाई व स्वच्छतेची कामे करत असतात तसेच येणाऱ्या भाविकांना दर्शन देण्यासाठी योग्य नियोजन करत असतात.

इतर बातम्या