Breaking news

राज्यात 4 आँक्टोबर पासून कोरोना नियमांचं पालन करून शाळांची घंटा वाजणार

मुंबई : गणेशोत्सवानंतर अद्याप तरी रुग्णसंख्या फारशी वाढलेली नाही. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा सुरु करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. राज्यात 4 ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचं पालन करुन शाळा करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात इयत्ता 5 वी ते 12 वी आणि शहरी भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

    कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियम पाळून शाळा सुरु केल्या जाणार आहेत. तसेच संबंधित शाळा सुरू किंवा बंद करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे राहतील, असंही शासनाने स्पष्ट केलं आहे. मात्र, गेल्या दीड वर्षापासून बंद असणाऱ्या शाळा सुरु होत असल्यानं विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी ही आनंदाची बाब आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. येत्या 4 तारखेपासून शाळा सुरु होणार आहेत. त्या त्या जिल्ह्याची परिस्थिती पाहून शाळा सुरु केल्या जाणार आहेत. आणि मला वाटतं बऱ्याच जिल्ह्यात वातावरण चांगलं आहे. कोरोना संपल्यात जमा आहे. पुन्हा कोरोना रुग्ण वाढले तर शाळा सुरु किंवा बंद करण्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार राहतील, असं शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. 

     राज्य शासनाला या आधीच चाइल्ड टास्क फोर्सकडून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्या त्या जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता स्थानिक प्रशासन आणि अधिकारी तेथील शाळा सुरू करण्यासंदर्भात योग्य निर्णय घेऊ शकतील, शाळा सुरू करता येतील, असं चाइल्ड पारेख यांनी मत व्यक्त केलं होतं. चाइल्ड टास्क फोर्सकडून ज्या मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाला दिल्या गेल्या आहेत, त्याबाबतची तयारी करून राज्यभर एकत्रित शाळा सुरू करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने शाळा सुरू करणे योग्य ठरेल, असंही बकुळ पारेख यांनी म्हटलं आहे.

   शाळा सुरू करावी अशी शिक्षण तज्ज्ञांची आणि पालकांचीही मागणी होती. शाळांमध्ये येण्यासाठी पालकांची संमती असणं आवश्यक असणार आहे. तसंच विद्यार्थ्यांना अटेडन्सची कोणतीही सक्ती केली जाणार नसल्याचं स्पष्टीकरण वर्षा गायकवाड यांनी दिलं. शाळा सुरू झाल्या तरी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं लागणार आहे. याशिवाय टास्क फोर्सनं दिलेल्या स सूचनांचं पालन करण्यात येईल. प्रत्येक शाळांना आरोग्य केंद्राशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. याशिवाय विद्यार्थी आणि शिक्षकांसाठीही एसओपी तयार केली जाणार असून शाळांमध्ये कोणत्याही खेळांना परवानगी नसेल. शाळा सुरु करण्यासंदर्भात टास्क फोर्सनं दिलेल्या सूचना शाळांच्या मुख्याध्यापकांना कळवल्या जातील. टास्क फोर्सच्या सूचना आणि शालेय शिक्षण विभागानं तयार केलेल्या मार्गदर्शक सूचना लवकरचं विद्यार्थी पालक आणि शाळांना कळवली जाणार आहे. शाळांबाबतचे सर्व अधिकार स्थानिक प्रशासनाकडे असणार असून निवासी शाळांबाबत अद्याप निर्णय झाला नसल्या त्यांनी स्पष्ट केलं.

   विद्यार्थ्यांबद्दल शिक्षकांना माहिती अवगत करून देणं आणि त्यांच्याशी कसं वागावं हे शिक्षकांना सांगणं. शिक्षक आणि पालक यांच्या बैठकीत काय चर्चा व्हायला हवी. याशिवाय घरात शिरताना मुलांनी कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी, गणवेश धुणे, आंघोळ करणे अशा बाबींचाही नियमावलीत समावेश करण्यात आल्याचं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं.

इतर बातम्या