Breaking news

Sarju Bhavani Cricket : सरजु भवानी क्रिकेट स्पर्धेत नमो स्पोर्टने मिळविले विजेतेपद

लोणावळा : लोणावळा शहरातील मानाची क्रिकेट स्पर्धा समजली जाणार्‍या सरजु भवानी क्रिकेट स्पर्धेत मुंबईच्या नमो स्पोर्टस संघाने विनोद राघवन क्रिकेट अँकेडमी (मंडल) संघाचा 37 धावांनी पराभव करत विजेतेपद मिळविले. 62 व्या सरजु भवानी स्पर्धेचे विजेतेपद मिळविल्यानंतर नमो संघाने मैदानावर जल्लोष केला. रेल्वेचे दिवंगत क्रिकेटपटू सरजू भवानी यांच्या नावाने मागील 62 वर्षापासून या स्पर्धेचे आयोजन सेंट्रल रेल्वेकडून केले जाते. भारतीय क्रिकेट संघात नावाजलेले अनेक क्रिकेटर याच मैदानात व स्पर्धेतून पुढे गेले आहेत. नॅशनल मजदूर युनियन लोणावळा संचलित व सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्युट लोणावळा यांच्या वतीने काॅ. वेणू. पी. नायर महामंत्री एनआरएमयू यांच्या मार्गदर्शनाखाली सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 16 दिवस सुरु असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी पार पडला. पुणे, मुंबई, रायगड, ठाणे जिल्ह्यातील 16 संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.

     अंतिम सामन्यात मंडल संघाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना नमो संघाने जोरदार फटकेबाजी करत 20 षटकात 165 धावांचे आवाहन मंडल संघासमोर ठेवले होते. ही धावसंख्या गाठणात 128 धावांवर मंडल संघ सर्वबाद झाला. 37 धावांनी नमो संघाने विजेतेपद मिळविले तर स्पर्धेतील उपविजेतेपद मंडल संघाला मिळाले. स्पर्धेत सर्वोत्कृष्ट फलंदाज या बहुमान हार्दिक याला देण्यात आला. तर सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून मयुरेश तंडेल, मॅन आँफ द सिरिज गौतम तोमर याला गौरविण्यात आले. अंतिम सामन्याचा सामनावीर हा किताब पराग खानापूरकर याने पटकाविला. अंतिम सामना पाहण्यासाठी रेल्वे मुंबई विभागाचे क्रिडा अधिकारी आर.के. चोवे, एनआरएमयू चे ऄ.जी.एस. जयंत पाटील, सि.बी. अँलेक्स, अँड. आलिम शेख, निखिल कविश्वर, क्रिडा सचिव कमरान चौधरी, विशाल पाडाळे आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा सन्मान व विजेत्यांना सन्मान सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्युटचे सचिव मयुर पाडाळे, शेखर शेळके, दशरथ कालेकर, भुषण सुर्वे, स्वप्निल पिंगळे, प्रशांत फाटे, सोमनाथ गुजर, मयुर बोरकर, सागर ठुले, सुरज हुलावळे, खंडू केदारी, व्हॅलेंटाइन डिसूझा, आण्णा शिंगाडे, संदीप विकारी, उमेश येवले, संजय मराठे, निलेश शिंदे यांनी केला.

इतर बातम्या

वसंत व्याख्यानमाला | कारगिल टायगर हिल्सवर 150 जणांच्या विरोधात आम्ही 7 जण लढलो, डोळ्यातून - नाकातून रक्त गळत होते, अंगभर गोळ्या होत्या मात्र लढण्याची जिद्द व आत्मविश्वास कायम होता - परमवीर चक्र विजेते योगेंद्र सिंह याद