Breaking news

Maval Good News : औंढे गावातील संतोष ठाकर यांची मुंबई पोलीस दलात निवड

लोणावळा : मावळ तालुक्यातील औंढे या गावातील संतोष दिलीप ठाकर यांची नुकतीच मुंबई पोलीस दलात काॅन्स्टेबल भरती प्रक्रियेत खुल्या गटातून निवड झाली आहे. 150 पैकी 125 गुण मिळवत त्यांनी हे यश मिळविले आहेत. या भरती प्रक्रियेत 8000 युवक होते. त्यामधून संतोष यांचा 203 वा क्रमांक आला आहे.  

     2018 सालापासून संतोष हे पोलीस भरती प्रक्रियेत सहभाग घेत होते. पहिल्या वेळी त्यांचा तीन गुणांनी नंबर हुकला, 2021 साली अवघ्या एक गुणांनी नंबर गेला मात्र त्यांनी जिद्द सोडली नाही. 2023 साली पुन्हा त्यांनी भरती प्रक्रियेत सहभाग घेत हे यश संपादित केले आहे. त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

इतर बातम्या