Breaking news

वरसोली गावचे सरपंच संजय खांडेभरड यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान

लोणावळा : वरसोली गावचे लोकनियुक्त सरपंच संजय खांडेभरड यांना आज राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार देऊन गौरवण्यात आला. अहमदनगर येथे आज हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. स्वराज्य सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला.

    संजय खांडेभरड हे वरसोली गावचे लोकनियुक्त सरपंच आहेत. मागील पंचवार्षिक काळात हे गावचे उपसरपंच होते. सरपंच पदाच्या काळात त्यांनी गावात केलेली विकासकामे याची दखल घेत सरपंच सेवा संघाकडून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

    यावेळी स्वराज्य सरपंच सेवा संघाचे संस्थापक बाबासाहेब पावसे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रोहित संजय पवार, राज्य संपर्क प्रमुख अमोल शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

इतर बातम्या