Breaking news

ज्ञानसागराला अभिवादन l लोणावळ्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

लोणावळा : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी लोणावळा शहरातील समूह शिल्प परिसरामध्ये सर्वपक्षीय नेते पदाधिकारी कार्यकर्ते व लोणावळा शहर परिसरातील नागरिकांनी उपस्थिती लावली होती. सकाळपासूनच नागरिक या ठिकाणी येऊन मेणबत्ती पेटवर व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करत होते. सोबतच शहरांमधील छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रपिता महात्मा गांधी, संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले आदी महापुरुषांच्या प्रतिमांना देखील पुष्पहार अर्पण करत अभिवादन करत होते.

     रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस सूर्यकांत वाघमारे, माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर, माजी उपनगराध्यक्ष राजू बच्चे, लोणावळा शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष कमलशील म्हस्के, लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विलास बडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष नासिर शेख, शिवसेना शहर प्रमुख संजय भोईर, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष रवी पोटफोडे, शिवसेना महिला शहर संघटिका मनीषा भांगरे, युवासेना अध्यक्ष विवेक भांगरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला अध्यक्ष श्वेता वर्तक, ज्येष्ठ नेते बाळासाहेब पायगुडे, राष्ट्रवादी युवकचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विनोद होगले, लोणावळा शहराध्यक्ष अजिंक्य कुटे, रमेश भांगरे, अशोक बोभाटे, जाकीर खलिफा, कृष्णा साबळे, पराग राणे आदींसह विविध भागांमधून आलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


इतर बातम्या