Breaking news

आषाढी एकादशीच्या निमित्त रोटरी व क्लब महिंद्रा यांच्या वतीने लोणावळ्यात 500 फळ झाडांचे वाटप

लोणावळा : रोटरी क्लब ऑफ लोणावळा व क्लब महिंद्रा यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित्त मंगळवारी लोणावळा शहरातील लोहगड उद्यान परिसरात 500 फळ झाडांचे वाटप करण्यात आले.                   

       रोटरी क्लबचे अध्यक्ष जयवंत नलवडे व क्लब महिंद्राचे एच आर मॅनेजर अहमद यांच्या प्रमुख उपस्थितीत  शहरातील नागरिकांना आंबा, पेरू, फणस, सिताफळ अशी विविध फळ झाडे वाटप करण्यात आली.

  या कार्यक्रमात रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष पुंडलिक वानखेडे, रवींद्र कुलकर्णी, बापूसाहेब पाटील, खजिनदार गोरख चौधरी, रो. दिलीप पवार, प्रकल्प प्रमुख अशिष मेहता व क्लब महिंद्राचे एग्रीकल्चर विभाग प्रमुख चंद्रशेखर पाटील या मान्यवरांच्या हस्ते फळझाडे वाटप करण्यात आली. याप्रसंगी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष बापूसाहेब पाटील यांनी फळ झाडे लावण्याबाबतची माहिती दिली. रोटरी क्लब ऑफ लोणावळा व क्लब महिंद्रा यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम हाती घेतला आहे. रोटरीचे अध्यक्ष जयवंत नलवडे म्हणाले वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे. नैसर्गिक रित्या ऑक्सिजन निर्मिती वृक्षच करु शकतात त्यामुळे प्रत्येकाने किमान 5 झाले लावून त्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन केले.

  ओळकाईवाडी परिसरात मंदिराच्या बागेत फळ झाडांचे वृक्षारोपण जयवंत नलवडे, अहमदसर, आशिष मेहता, गोरख चौधरी व कुसगाव ग्रामस्थ यांचे हस्ते करण्यात आले. प्रकल्प प्रमुख आशिष मेहता यांनी क्लब महिंद्रा व रोटरी पदाधिकारी उपस्थित नागरिकांचे आभार मानले.

इतर बातम्या