Breaking news

लोणावळा काँग्रेसकडून सोमवारी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको; राष्ट्रीय काँग्रेसच्या भारत बंदमध्ये सहभागी होण्याचे व्यापारी वर्गाला आवाहन

लोणावळा : केंद्र सरकारने शेतकरी विरोधी असलेले तीन कायदे मागे घ्यावे तसेच तरूणांमध्ये वाढती बेरोजगारी आणि पेट्रोल, डिझेल, गॅसचे वाढते दर या मुद्द्यावर केंद्र सरकारला घेरण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून सोमवारी भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे. त्याला अनुसरून लोणावळा शहर काँग्रेसच्या वतीने लोणावळा शहरात बंदचे आवाहन व्यापारी वर्गाला करण्यात आले असून राष्ट्रीय महामार्गावर कुमार चौकात सकाळी 11 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

    लोणावळा शहर काँग्रेसच्या वतीने याबाबतची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव निखिल कवीश्वर, लोणावळा शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, युवक अध्यक्ष दत्ता दळवी, कार्ड कमिटी सदस्य रवी सलोजा, वसंत भांगरे, सुबोध खंडेलवाल, अब्बास शेख, जंगबहादूर बक्षी आदी उपस्थित होते.

इतर बातम्या