लोणावळा पुणे दरम्यान दुपारची लोकल सेवा पूर्ववत करा; सर्व एक्सप्रेस गाड्यांना लोणावळ्यात पूर्ववत थांबा द्या !
लोणावळा : लोणावळा पुणे दरम्यान दुपारची लोकल सेवा पूर्ववत करा व एक्सप्रेस गाड्यांना लोणावळ्यात थांबा द्या अशी मागणी आज लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना निवेदन देऊन करण्यात आली.
लोणावळा रेल्वे स्टेशनवर पूर्वीपासून सर्व एक्सप्रेस गाड्या थांबत होत्या. परंतु कोरोना नंतर काही एक्सप्रेस गाड्या येथे थांबा घेत नाहीत. मेल एक्सप्रेस गाड्या टेक्निकल हॉल्ट साठी खंडाळा येथे थांबतात. त्यामुळे लोणावळा शहर व ग्रामीण परिसरातील नागरिकांना, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला भगिनी, दूध व्यावसायिक, छोटे मोठे व्यावसायिक यांना त्रास सहन करावा लागत आहे. याकरिता सर्व एक्सप्रेस गाड्यांचा थांबा पूर्ववत करावा व दुपारची लोणावळा पुणे लोकल चालू करण्यात यावी अशी मागणी लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.
रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांना भेटून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू असे आश्वासन खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी यावेळी दिले आहे. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरदराव हुलावळे, उपतालुका प्रमुख राम सावंत, शिवसेना लोणावळा शहरप्रमुख संजय भोईर, उपशहर प्रमुख विशाल पाठारे, सोशल मीडिया समन्व्यक नंदू कडू, विभागप्रमुख प्रमोद लोहिरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.