Breaking news

मुंबई पुणे लोहमार्गावर बोरघाटात दरड कोसळली; रेल्वे वाहतूक विस्कळीत

बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

खोपोली : मुंबई पुणे लोहमार्गावर मंकी हिल ते पळसदरी दरम्यान अनेक ठिकाणी लोहमार्गावर दरड कोसळल्याने मुंबई पुणे रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. लोणावळा खंडाळा व घाट परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे घाट क्षेत्रात आठ ते दहा ठिकाणी डोंगरावरील दगड, माती व राडारोडा रेल्वे मार्गावर आल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही ठिकाणी रेल्वे रुळाखालील माती वाहून गेली आहे तर वार्‍यामुळे खांब वाकले आहे. विज वाहिन्या तुटल्यामुळे वाहतूक खंडित झाली आहे.

    रेल्वे सेवा ठप्प झाल्याने रेल्वेने प्रवास करणार्‍या नागरिकांना जागोजागी आडकून पडावे लागले आहे. रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे रुळावरील सदर राडारोडा बाजुला करण्याचे काम युद्ध पातळीवत सुरू असले तरी पावसामुळे पुन्हा पुन्हा माती खाली येत असल्याने पुढील काही काळ रेल्वे वाहतूक बंदच राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

इतर बातम्या