Breaking news

कमिटीला सामोरे जाताना या पुस्तकाचे लोणावळ्यात प्रकाशन

लोणावळा : “कमिटीला सामोरं जाताना” या चेतन टाकसाळे लिखित पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी लोणावळ्यात झाले. वल्लरी प्रकाशन, पुणे तर्फे लोणावळा येथील सफायर हॉटेल मध्ये हा पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. 

     प्रकाशनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कैवल्यधाम योग संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी, माजी सहायक ग्रंथपाल डॉ. भाऊसाहेब पानगे, ग्रंथालय व माहिती शास्त्र विभागाचे डॉ. राजेंद्र कुंभार हे मान्यवर उपस्थित होते. प्रकाशना दरम्यान लोणावळा नगरपरिषद, लोणावळा संचलित साने गुरुजी ग्रंथालयास “उत्कृष्ट ग्रंथालय” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचा स्विकार ग्रंथालयाचे ग्रंथपाल विजय लोणकर यांनी केला. प्रकाशनासाठी ग्रंथालय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी नातेवाईक, मित्रपरिवार यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवली रोहिणी टाकसाळे यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले.

इतर बातम्या