Breaking news

प्राध्यापक सुहास देशमुख यांची आम आदमी पार्टी रायगड जिल्हा सल्लागार पदी नियुक्ती

खोपोली : आम आदमी पार्टीच्या रायगड जिल्हा सल्लागार पदी नुकतीच प्रा. सुहास देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. आम आदमी पार्टी देशामध्ये झपाट्याने वाढत आहे. दिल्ली व पंजाब जिंकल्यानंतर आम आदमी पार्टी गुजरात मध्ये आपले वर्चस्व वाढवत आहे. नुकतीच आम आदमी पार्टी रायगड जिल्हा कार्यकारीणीची बैठक पेण येथे संपन्न झाली. त्या बैठकीत जिल्हा कार्यकारिणी सर्व संमतीने दिल्लीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात, महाराष्ट्र संयोजक रंगाभाऊ राचुरे, सह संयोजक किशोर मध्यान, राज्य सचिव धनंजय शिंदे, कोकण विभाग संयोजक अल्तमश फैजी, व रायगड जिल्हा संयोजक मनोज घरत, यांच्या सहकार्याने सर्वानुमते ठराव मंजूर करून प्रा. सुहास दिनकर देशमुख यांना रायगड जिल्हा सल्लागार पदी नियुक्त केले आहे. प्रा. सुहास दिनकर देशमुख हे खोपोली येथील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये मेकॅनिकल चे प्रोफेसर होते. ते लेखक असून त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आम आदमी पार्टीला त्यांच्या अनुभवाचा नक्कीच फायदा होईल व पक्षाच्या पुढील वाटचालीस त्यांचा खूप मोठा योगदान होईल असा विश्वास कर्जत खालापूर विधानसभा प्रभारी डॉ रियाज पठाण यांनी व्यक्त केला. खोपोली शहर अध्यक्ष ग्यासूद्दीन खान, खालापूर तालुका उपाध्यक्ष कस्तुरचंद राठोड, खालापूर तालुका सचिव जहीर अहमद, खोपोली शहर उपाध्यक्ष शिवा शिवचरण, शिळफाटा अध्यक्ष विवेक वाघमारे यांनी सुहास देशमुख यांचे पक्षामध्ये स्वागत केले.

इतर बातम्या