प्रा. धनराज पाटील यांची मराठी विषय शिक्षक महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड
लोणावळा : लोणावळा महाविद्यालयाचे प्रा. धनराज पाटील यांची मराठी विषय शिक्षक महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय शिक्षक महासंघ राज्यस्तरीय कार्यकारणी समितीच्या सभेत सर्वानुमते ही निवड करण्यात आली. ही निवड संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुनील डिसले, मा. सचिव बाळासाहेब माने, कार्याध्यक्ष डॉक्टर मनीषा रिठे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी पुणे जिल्हा व शहर महाविद्यालय मराठी विषय महासंघाची ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. जिल्हा अध्यक्ष अरविंद मोडक यांनी धनराज पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचा उल्लेख करत शुभेच्छा दिल्या.
लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष रमेशचंद्र नय्यर, उपाध्यक्ष दत्तात्रय पाळेकर, सचिव ॲड. नीलिमा खिरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन केले.