Breaking news

श्री एकविरा विद्या मंदिर शाळेच्या पाच विद्यार्थ्यांचे एनएमएमएस परीक्षा गुणवत्ता यादीत स्थान

लोणावळा : मावळ तालुक्यातील नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळच्या श्री एकविरा विद्या मंदिर शाळेतील पाच विद्यार्थी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृती (एनएमएमएस)  परीक्षेत पुणे जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत. यामध्ये खुल्या संवर्गातून सातवी तर अनुसुचित जाती संवर्गातून कु समृद्धी राहुल काळे ही विद्यार्थींनींने संपूर्ण पुणे जिल्ह्यात पहिली आली आहे.

   महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या अर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत श्री एकविरा विद्या मंदिरातील कु. समृद्धी राहुल काळे, कु प्रणाली दिपक नरवडे, कु ज्ञानेश्वरी संतोष हुलावळे, अनिशा गणेश गायकवाड, कु कृष्णा हरिचंद्र केदार या पाच विद्यार्थ्यांची निवड झाली असून या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी साठ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.

   या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक उमेश किसन इंगुळकर हे दरवर्षी शाळेचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत आणत असून आतापर्यंत 23 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. यावर्षी देखील पाच विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत आणत शाळेच्या व नु. म. वि. संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्याचे काम केले असल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या सारथी योजनेअंतर्गत छत्रपती राजाराम महाराज शिष्यवृत्ती साठी कु श्रावणी उत्तम तरस, अनुष्का सोपान येवले, श्रृती गणेश देवकर, रोहित अंकुश हुलावळे, स्नेहा अनिल नाणेकर, गौरव सोमनाथ गायकवाड, मंथन गणपत ढाकोळ, कावेरी भोजराज तरोणे या विद्यार्थांची निवड झाली आहे.

     या यशस्वी विद्यार्थांचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री संजय भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार राजेश म्हस्के, शालेय समिती अध्यक्ष सोनबा गोपाळे, मुख्याध्यापक संजय वंजारे, सरंपच दिपाली हुलावळे, उपसरपंच किरण हुलावळे, संस्था संचालक मंडळ सर्व कार्ला ग्रामपंचायत सदस्य, शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच  कार्ला परिसरातील ग्रामस्थांनी  अभिनंदन होत आहे.

इतर बातम्या