Breaking news

Police Root March l निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यात पोलिसांचा रूटमार्च

मावळ माझा न्युज नेटवर्क : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यात आज पोलीस प्रशासनाच्या वतीने रूटमार्च काढण्यात आला होता. निवडणुका ह्या भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात तसेच निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचा संदेश या रूटमार्च मधून नागरिकांना देण्यात आला.

     लोणावळा उप विभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मायने, लोणावळा शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप, सहायक पोलीस निरीक्षक राहुल लाड, पोलीस उप निरीक्षक रमेश भिसे, पोलीस उप निरीक्षक साळुंखे यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी या रूटमार्च मध्ये सहभागी झाले होते. 

     लोणावळा हे पर्यटन स्थळ असून ते मावळ विधानसभा मतदार संघात आहे. या शहरातील कायदा व सुव्यवस्था निवडणूक काळात अबाधित रहावी यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. पोलीस स्टेशन, मिनारा मस्जिद, लोणावळा गावठाण, भैरवनाथ मंदिर, मावळा पुतळा चौक, जयचंद चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक असा रूटमार्च काढण्यात आला होता.

इतर बातम्या