Breaking news

Tree plantation l गेस्टम्प कंपनी चाकण व ग्रामपंचायत महाळुंगे इंगळे यांच्या वतीने सहाशे देशी झाडांचे वृक्षारोपण

मावळ माझा न्युज नेटवर्क : हो फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन पुणे गेस्टम्प कंपनी चाकण व ग्रामपंचायत महाळुंगे इंगळे यांच्या वतीने सहाशे देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. 

     या वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरुवात कंपनीचे सीएसआर विभागाचे प्रमुख एच.आर. विशाल भणगे यांच्या हस्ते कडुनिंबाचे रोप लावून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व गेस्टॅम्प कंपनीचे अधिकारी कर्मचारी हो फाउंडेशनचे सर्व अधिकारी कर्मचारी, स्थानिक महिला भगिनी व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, कर्मचारी यांच्या हस्ते रोपे लावण्यात आली. 

     अनेक मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली. युनियन लीडर अमित येळवंडे म्हणाले,  झाडे लावली म्हणजे काम झाले असे नाही तर ही झाडे जगवणे महत्त्वाचे आहे. या झाडांची काळजी आपण सर्वजण घेऊयात व प्रत्येक झाड जागवण्यासाठी प्रयत्न करूयात. सरपंच अर्चनाताई महाळुंगकर यांनी ग्रामपंचायतच्या वतीने आभार व्यक्त केले. तसेच पुढील काळात देखील आपण सहकार्य करावे अशी विनंती केली. तसेच या झाडांची काळजी आम्ही घेऊ असे त्यांनी आश्वासन दिले. अत्यंत चांगल्या दर्जाची पाच फुटाची कडुलिंब, आपटा, वड, पिंपळ, जांभूळ, फणस, गुलमोहर, आवळा, या विविध प्रकारची झाडे  संस्थेंतर्गत देण्यात आली आहेत.

इतर बातम्या