Breaking news

Expressway Accident l मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात पिकअप उलटला; 15 प्रवासी जखमी

खोपोली : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज 28 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास एक बोलेरो पिकअप टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटला. या अपघातात टेम्पो मधील 15 प्रवासी जखमी झाले आहेत. पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवर किमी 44/500 जवळ हा अपघात झाला.

     मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईच्या दिशेने येत असलेला पिकअप टेम्पो (MH 06 BV 6061) हा चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटला. या पिकअप मध्ये 25 ते 30 प्रवासी बसले होते. त्यातील 15 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना आयआरबी आणि  लोकमान्य हॉस्पिटलच्या ॲम्बुलन्सच्या सहाय्याने  खोपोली नगर पालिका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी शिफ्ट करण्यात आले आहे.

     या अपघातातील बोलेरो पिकअप क्रेनच्या सहाय्याने बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. आय आर बी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल यांनी तातडीने मदत कार्य केले. महामार्ग वाहतूक पोलीस बोरघाट आणि खोपोली पोलीस स्टेशनच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

इतर बातम्या