Breaking news

मावळातील पवना धरण 89 टक्के भरलं; सोमवारी लोणावळ्यात 41 तर पवना धरणात 37 मिमी पाऊस

पवनानगर : मावळ तालुका व पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे मावळ तालुक्यातील पवना धरण 89.29 टक्के भरले आहे. सोमवारी 24 तासात लोणावळा शहरात 41 मिमी तर पवना धरण परिसरात 37 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

    पवना धरण भरल्याने मावळ व पिंपरी चिंचवडकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. यावर्षी 1 जुनपासून आजपर्यत लोणावळा शहरात 3224 मिमी (126.93 इंच) पाऊस झाला आहे. तर पवना धरण परिसरात 1901 मिमी (74.84 इंच) पाऊस नोंदविण्यात आला आहे.

    मावळ तालुक्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने मावळातील आंद्रा धरण 100 टक्के भरले आहे. तर वडिवळे धरणात 80.98 टक्के, कासारसाई 88.48. यासह टाटा कंपनीच्या ठोकळवाडी, शिरोटा, वलवण व लोणावळा धरणात मुबलक पाणीसाठा झाल्याने पाण्याची चिंता मिटली आहे.

इतर बातम्या