आषाढी एकादशी निमित्त वृक्ष दिंडी व ग्रंथ दिंडीचे आयोजन
मावळ माझा न्युज नेटवर्क : आषाढी एकादशी निमित्त भारतीय जैन संघटना संचालित प्राथमिक विद्यालय, संत तुकारामनगर, पिंपरी या शाळेत वृक्षदिंडी व ग्रंथदिंडीचे आयोजन आज मंगळवारी (16 जुलै) करण्यात आले होते.
याप्रसंगी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संजय जाधव, विद्यालयाचे प्राचार्य दिलीप देशमुख, उपप्राचार्य राजेंद्र कोकणे, प्रा. संपत गर्जे, पालक संघाचे उपाध्यक्ष शैनाज गवंडी, सहसचिव सारिका लोंढे उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे विद्यमान नगरसेविका सुलक्षणाताई धर उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते वृक्षदिंडी व ग्रंथदिंडीचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वृक्षांचे महत्त्व व वृक्ष लागवडीसाठी प्रतिज्ञा म्हणून घेतली. यावेळी झाडे लावा झाडे जगवा, पाण्याचा वापर जपून करा, हवी असेल शुद्ध हवा तर आजच झाडे लावा अशा विविध घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. या ग्रंथदिंडीसाठी बालवाडी ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या सोहळ्यात अनेक विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत जनाबाई, संत नामदेव, संत मुक्ताबाई यासह भगवान शंकर व भगवान विष्णू यांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते. शाळेतील शिक्षिका शैला बर्वे यांनी विद्यार्थ्यांसह हरी तू आमचा रे सवंगडी, मनात भरली पंढरी, देव जेवला हो, ही भजने सादर केली.
आषाढी एकादशीनिमित्त शाळेत बालवाडी ते चौथी या गटात भजन स्पर्धा घेण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी आनंदाने व उत्साहाने भजने सादर केली. ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आल्या होत्या. बालवाडी ते दुसरी प्रथम गट व दुसरा गट तिसरी व चौथी यांच्यात ही स्पर्धा घेण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय सुरेख असे भजन सादर केले. एकूण 350 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
लहान गट निकाल : प्रथम - इ. 2 री ब, द्वितीय - इ. 2 री अ, तृतीय - इ. 1 ली ब, उत्तेजनार्थ - इ. 1 ली अ, बालवाडी मोठा गट - विशेष प्राविण्य प्राप्त. मोठा गट निकाल : प्रथम - इ. 3 री. ब, द्वितीय - इ. 4 थी अ, ब विभागून देण्यात आला, तृतीय - इ. 3 री अ.
ग्रंथदिंडी, वृक्षदिंडी व भजन स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी दीपिका सावंत, शैला बर्वे, अरुणा धिवार, स्नेहलता वाडेकर, अपर्णा कुमठेकर, प्रदीप बोरसे, विलास गुंजाळ, सायली माने, जाधव सुवर्णा, सविता अमोलिक, भाग्यश्री भोईर, प्रणाली खंडागळे यांनी परिश्रम घेतले.