Breaking news

Maval News : नवरात्र उत्सवानिमित्त 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' मोहिम; महिलांची होणार मोफत आरोग्य तपासणी

लोणावळा : नवरात्र उत्सवानिमित्त ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ मोहिम संपूर्ण मावळ तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात रबिवले जात आहे. या मोहिम अंतर्गत 18 वर्षांवरील सर्व महिलांची आरोग्य तपासणी मोफत केली जाणार आहे. माता सुरक्षित तर घर सुरक्षित या मोहिम अंतर्गत सर्व गरोदर मातांनी आपली काळजी कशी घ्यावी तसेच वेळोवेळी उपचार घ्यावे, अल्ट्रासाऊंड (सोनोग्राफी) गरोदर मातांनी कधी करावी तसेच कोण कोणत्या तपासण्या केल्या पाहिजेत व गरोदर मातांनी आहार कोणता घ्यावा व कसा घ्यावा या संदर्भात ग्रामीण रुग्णालय काले कॉलनी चे स्रिरोगतज्ञ डॉक्टर स्वाती पुल्लेवार यांनी महिलांना मार्गदर्शन केले. 

मावळ माझा न्युजचा वाॅटसअप ग्रुप जाॅईन करा व मिळवा बातम्यांचे अपडेट्स क्षणाक्षणात

तसेच रुग्णालय काले कॉलनी या रुग्णालयात माता सुरक्षित तर घर सुरक्षित या मोहिमेला महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. या मोहिमे अंतर्गत महिलांच्या विविध समस्या व वयाच्या पन्नास वर्षानंतर येणाऱ्या समस्या, त्या वरील उपाय योजना महिलांना सांगण्यात आल्या. या मोहिमेचा लाभ अधिकाधिक महिलांनी घ्यावा असे आव्हान आरोग्य विभाग मार्फत करण्यात आले. महिलांच्या सर्व रक्ताच्या तपासण्या, डोक्याची तपासणी, गरज असल्यास एक्सरे, इ.सी.जी, इत्यादी तपासण्या सर्व शासकीय रुग्णालयात मोफत उपलब्ध आहेत. 

मावळ माझा न्युजचा वाॅटसअप ग्रुप जाॅईन करा व मिळवा बातम्यांचे अपडेट्स क्षणाक्षणात

वैद्यकीय अधीक्षक डॉ. खैरमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ इंद्रनील पाटील, मंजुषा कदम, शोभा राठोड, सविता मुढे, सतीश सोमासे वृषाली गायकवाड, दिपाली रावअंदोरे, सागर गलीयल, मुक्तार शेख, कविता बवरे आदी कर्मचारी उपस्थित होते.

गरोदर मातांनी हा आहार घ्यावा - (आहारा मध्ये पालेभाज्या, कडधान्य, दूध, तूप, मांसाहार, अंडी ह्या गोष्टीचे जास्त प्रमाणात सेवन करावे.)

कोणत्या तपासण्या केल्या पाहिजेत - (शरीरातील रक्ताचे प्रमाण, साखरेचे प्रमाण, गलगंड, कॅल्शियम, एच आय व्हि, HbsAg, डेंग्यू, मलेरिया ह्या तपासण्या करून घेणे गरचे आहे.)

इतर बातम्या