Breaking news

Expressway : एक्सप्रेस वेवर आयशर टेम्पोला भिषण आग; एकाचा होरपळून मृत्यू

खोपोली (गुरुनाथ साठेलकर) : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मागील काही दिवसात वाहनांना आग लागण्याच्या घटना सातत्याने वाढल्या आहेत. मंगळवारी मध्यरात्री रसायनी जवळ किमी 18/900 याठिकाणी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका आयशर टेम्पोला अचानक आग झाली. ही आग ऐवढी भयंकर होती की, यामध्ये एकाचा होरपळून मृत्यू झाला आहे. सदरची व्यक्ती पुरुष आहे की महिला याची ओळख पटविण्यासाठी मृतदेह चौक प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

    आगीची माहिती समजताच खोपोली अग्नीशमन दल, सिडको, रिलायन्स यांची अग्नीशमन यंत्रणा, देवदूत पथक, आयआरबी, डेल्टा फोर्स, वाहतूक पोलीस पळस्पे, रसायनी पोलीस, अपघातग्रस्तांच्या मदतीला संस्थेचे कार्यकर्ते यासर्वांनी मिळून पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आग नियंत्रणात आणली. या घटनेमुळे सुमारे चार ते पाच किमी अंतरापर्यत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

   मिळालेल्या माहितीनुसार टेम्पोमध्ये सौंदर्य प्रसाधने, केमिकल, आगरबत्ती, वायर इत्यादी साहित्य होते. यामध्ये केमिकल देखील होते. सदरचा टेम्पो पुणे लेनवर मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास बंद पडला होता. आयआरबी पेट्रोलिंग यांनी वाहनांला बॅरिकेटिंग लावून सुरक्षित केले होते. परंतू त्यानंतर काही वेळाने त्या वाहनांला आग लागल्याने ही भिषण घटना घडली.

इतर बातम्या