Breaking news

Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकांसाठी 2 डिसेंबरपर्यंत ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा

पुणे : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने विविध जिल्ह्यांतील (Gram Panchayat Election) ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा दिली आहे. तसेच नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत वाढविली आहे. राज्य निवडणूक आयोगाने 9 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या (Gram Panchayat Election) सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 (दुपारी 3 वाजेपर्यंत) या कालावधीत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यात आता अंशत: दुरूस्ती करून नामनिर्देशनपत्र पारंपरिक (ऑफलाईन) पद्धतीने 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत सादर करता येतील असे राज्य निवडणूक आयुक्त यु.पी.एस. मदान यांच्या आदेशानुसार स्पष्ट करण्यात आले आहे.

इतर बातम्या