Breaking news

MONSOON UPDATE : महाराष्ट्रात पुढचे काही दिवस पावसाचे; मेघगर्जनेसह होणार जोरदार पाऊस

पुणे : मान्सूनच्या परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाचे असणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

    सध्या मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. परतीच्या पावसात ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट होत असतो. यामध्ये झाडांखाली थांबणे अथवा बाहेर फिरणे धोकादायक असल्याने नागरिकांनी खबरादारी घेणे गरजेचे आहे. राज्यात 12 आँक्टोबर पर्यत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. लोणावळा व मावळ तालुक्यात मागील आठवड्यांपासून दुपारनंतर पावसाला सुरुवात होत आहे. दोन दिवसांपुर्वी कामशेत ते वडगाव दरम्यान ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. परतीच्या पावसात अचानक कोठेही अशा स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. 

इतर बातम्या