Breaking news

Maval News : 9 ऑगस्ट क्रांतीदिनी पवन मावळातील शहिदांना श्रद्धांजली

लोणावळा : पाण्यासाठी अकरा वर्षापूर्वी ऑगस्ट क्रांतीदिनी झालेल्या आंदोलनात पोलिसांनी केलेल्या गोळीबारीत शहिद झालेल्या तीन शहिद शेतकर्‍यांना आज श्रद्धांजली वाहण्यात आली. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर ज्याठिकाणी या शेतकर्‍यांना गोळ्या घालण्यात आल्या, त्याच ठिकाणी शिवसैनिकांनी जाऊन दरवर्षी प्रमाणे श्रद्धांजली वाहिली. 9 ऑगस्ट या क्रांतीदिनी पवना बंदिस्त जलवाहिनीच्या आंदोलनामध्ये शहीद झालेले शेतकरी कै कांताबाई ठाकर, शहीद कै मोरेश्वर साठे व शहीद कै शामराव तुपे यांच्या शहीद स्मृतीस अभिवादन करत ही श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शिवसेना माजी पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, माजी सरपंच बबन खरात, माजी उपतालुका प्रमुख मारुती खोले, माजी उपसरपंच अनिल भालेराव, पवना नगर शिवसेना शहरप्रमुख सुरेश गुप्ता, सुनील इंगुळकर, माजी उपसपंच श्यामबाबू वाल्मिकी, सनी मोहिते, कार्यालय प्रमुख तुषार घाग, उमेश ठाकर शाखाप्रमुख रामभाऊ डोंगरे, पप्पू खरात आदी पदधिकारी उपस्थित होते.

इतर बातम्या