Breaking news

Maval Murder Case : त्या नराधाम आरोपीचे वकीलपत्र न घेण्याचा वडगाव मावळ बार असोसिएशनने घेतला निर्णय

लोणावळा : पवन मावळातील कोथुर्णे या गावात घराच्या अंगणात खेळणार्‍या एका सात वर्षी मुलीचे अपहरण करत तीची निर्घृणपणे हत्या करणार्‍या नराधाम आरोपीचे वकीलपत्र न स्विकारण्याचा ठराव वडगाव मावळ बार असोसिएशनने केला आहे. मावळ तालुक्याच्या नावलौकिकाला काळिमा फासणारी दुदैवी घटना नागपंचमी च्या दिवशी घडली आहे. या घटनेचा सर्वस्तरातून निषेध व्यक्त केला जात असून या मावळच्या लेकीचा न्याय मिळवून देण्यासाठी अवघा तालुका एकवटला आहे. काल मावळ तालुक्यात बंद पाळत या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. मावळ तालुका बार असोसिएशनने देखील या घटनेतील आरोपीचे वकीलपत्र न स्विकारण्याचे ठरविले आहे. अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तीचा घरात खून करण्यात आला. मृतदेह लपविण्यात आला व नंतर तो फेकून देण्यात आला. हे निच कृत्य करणार्‍या नराधम युवकाला फाशीच व्हावी अशी अपेक्षा संपुर्ण तालुका व्यक्त करत आहे. याकरिता तालुक्यातील शहरं असो वा गावं, वाड्या वस्त्या सर्वत्र निषेध सभा सुरु असून प्रत्येक जण आरोपीला फाशी द्या अशी मागणी करत आहे. अनेक मान्यवरांनी मयत निष्पाप मुलीच्या आई वडिलांची भेट घेत त्यांचे सांत्वन करत धिर दिला. पोलीस प्रशासन देखील गतीमानतेने काम करत आहेत. या घटनेतील सर्व साक्षी पुरावे व तांत्रिक तपास योग्य पद्घतीने पुर्ण करत लवकरात लवकर ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला शिक्षा द्यावी अशी भावना सर्वजण व्यक्त करत आहेत.

इतर बातम्या