Breaking news

Maval Corona News : मावळ तालुक्यात आज बुधवारी कोरोनाचे 4 नविन रुग्ण तर 1 जणांला डिस्चार्ज

वडग‍ाव मावळ : मावळ तालुक्यात आज बुधवारी (08 डिसेंबर) कोरोनाचे 4 नविन रुग्ण मिळून आले असून कोरोनावर मात केलेल्या 1 जणांला डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे मावळ तालुक्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या 31 झाली आहे. यामध्ये तळेगाव शहरात 15, लोणावळा शहरात 5, वडगाव मध्ये 1 व ग्रामीण भागात 10 रुग्णांचा समावेश आहे. मावळ तालुका आरोग्य विभागाकडून आज प्रसिद्ध करण्यात आलेली ही आकडेवारी आयसीएमआर कडून प्राप्त झालेल्या अहवालावरून देण्यात आली आहे.  

         मावळ तालुक्यात आतापर्यत कोरोनाचे एकूण 27769 रुग्ण झाले असून यापैकी 27214 रुग्ण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत. तर आजपर्यत मावळात 524 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मावळ तालुक्यातील रुग्ण बरे होण्याचा दर हा 98 टक्के असून सक्रिय कोरोना रुग्णांचा दर 0.11 टक्के व मृत्यूदर 1.89 टक्के इतका आहे. मावळ तालुक्यात शहरी भागात आज 3 तर ग्रामीण भागात 1 रुग्ण मिळून आले आहेत. मावळ तालुक्यातील 10 गावांमध्ये कोरोना रुग्ण आहेत.

इतर बातम्या