Breaking news

MAVAL CORONA NEWS : मावळ तालुक्यात आज बुधवारी कोरोनाचे 18 नविन रुग्ण तर 10 जणांना डिस्चार्ज

वडग‍ाव मावळ : मावळ तालुक्यात आज बुधवारी (13 आँक्टोबर) कोरोनाचे नविन 18 रुग्ण मिळून आले आहेत. तर कोरोनावर मात केलेल्या 10 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे मावळातील कोरोना रुग्णसंख्या 123 झाली आहे. मावळ तालुका आरोग्य विभागाकडून आज प्रसिद्ध करण्यात आलेली ही आकडेवारी आयसीएमआर कडून प्राप्त झालेल्या अहवालावरून देण्यात आली आहे. 

        मावळ तालुक्यात आतापर्यत कोरोनाचे एकूण 27527 रुग्ण झाले असून यापैकी 26880 रुग्ण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत. तर आजपर्यत मावळात 524 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मावळ तालुक्यातील रुग्ण बरे होण्याचा दर हा 97.65 टक्के असून सक्रिय कोरोना रुग्णांचा दर 0.45 टक्के व मृत्यूदर 1.90 टक्के इतका आहे. 

    मावळ तालुक्यात शहरी भागात आज 13 तर ग्रामीण भागात 5 रुग्ण मिळून आले आहेत. मावळ तालुक्यातील 29 गावांमध्ये कोरोना रुग्ण आहेत. 

इतर बातम्या