Breaking news

महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने महेश केदारी यांचा सत्कार व नविन पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्रे

पिंपरी चिंचवड : महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल लोणावळ्यातील महेश केदारी यांचा संघटनेच्या वतीने भोसरी येथे सत्कार करण्यात आला तसेच पुणे जिल्ह्यातील काही नविन पदाधिकारी नियुक्त करत त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा अध्यक्ष महादेव कनगुळे व युवराज दळवी यांनी केले होते. जिल्हा अध्यक्ष दत्ता भाऊ घुले, पुणे शहर अध्यक्ष बाबासाहेब कोरे, मावळ तालुका अध्यक्ष विजय नलावडे, उपाध्यक्ष संतोष कालेकर, पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष वैभव छाजड, शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष रोहित सरोदे व पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. हा कार्यक्रम हॉटेल जंजिरा पुणे नाशिक हायवे भोसरी या ठिकाणी पार पडला.

इतर बातम्या

पुणे ग्रामीण जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट इ. यांच्याकरिता सीआरपीसी कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी; पालन न करणाऱ्या आस्थपनांवर होणार कठोर कायदेशीर कारवाई