Breaking news

राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दीपक मानकर यांचे निधन; लोणावळ्यातील सच्चा कार्यकर्ता हारपला

लोणावळा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सेवादलाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निकटवर्ती असलेले लोणावळ्यातील दीपक रामचंद्र मानकर यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शहरातील एक सच्चा कार्यकर्ता हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

    राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार व अजितदादा यांच्यावर प्रचंड निष्ठा असणारे दीपक मानकर यांचा लोणावळ्यात मंडपाचा व्यावसाय आहे. पक्षाच्या प्रती असलेली निष्ठा व कार्यतत्परा यामुळेच दीपक मानकर यांना पुणे जिल्हा सेवादल व महाराष्ट्र प्रदेश सेवादल या पदांवर काम करण्याची संधी मिळाली. शाहरुख या नावाने दीपक मानकर सर्वश्रूत होते. महाराष्ट्रात कोठेही पवार साहेबांचा कार्यक्रम असल्यास दीपक मानकर त्याठिकाणी हजर असत. सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पक्षाने त्यांना मुंबई येथील राष्ट्रवादी भवनात स्वतंत्र केबीन व एक वाहन देखील दिले होते. प्रकृती अस्वस्थतामुळे मागील काही दिवस ते आजारी होते. आज त्यांची सिद्धार्थनगर येथील राहत्या घरात प्राणज्योज मावळली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, भाऊ असा परिवार आहे. 

इतर बातम्या