Breaking news

विकेंड लाॅकडाऊनचे उल्लंघन करणार्‍या 160 पर्यटकांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी केली दंडात्मक कारवाई

लोणावळा : लोणावळा व मावळ परिसर मुसळधार पावसाने जलमय झालेला असताना या भागात विकेंड लाॅकडाऊनचे उल्लंघन करत फिरायला आलेल्या 160 जणांसह एका अस्थापनेवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली असल्याची माहिती लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर यांनी दिली.

    ग्रामीण पोलिसांनी सकाळपासूनच सर्व पर्यटनस्थळांकडे जाणारे रस्ते बंद केले होते. मागील तीन चार दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्व परिसर जलमय झाला असून पर्यटनस्थळांवर जाणे धोकादायक बनलेले असताना देखील काही पर्यटक यासर्व बाबी तसेच कोरोना व विकेंड लाॅकडाऊन नियम याकडे कानाडोळा करत पर्यटनस्थळांवर जाण्यासाठी आले होते. यापैकी विनामास्क फिरणार्‍या तब्बल 151 जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून 75 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला.  विनाकारण फिरणार्‍या 9 जणांकडून 9 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तर नियम मोडणार्‍या एका हाॅटेलवर भा.दं.वि. 188 प्रमाणे खटला दाखल करण्यात आला आहे.

इतर बातम्या