गौतम हॉटेल समोर रस्त्यावर रात्री पडलेले झाड बाजूला करण्यात लोणावळा नगर परिषद पथकाला यश
लोणावळा : रेल्वे विभागातील रस्त्यावर गौतम हॉटेल समोर शुक्रवारी रात्री एक मोठे झाड पडले होते. त्यामुळे रेल्वे विभागातील एक रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. सदरचे झाड मोठे असल्याने व पाऊस पडत असल्याने झाड बाजूला करण्यासाठी आजची दुपार झाली. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हे झाड पूर्णतः कापून बाजूला करण्यात वृक्ष विभागाला यश आले आहे. दुपारनंतर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.