Breaking news

Lonavala Shivdurga Fitness : राज्यस्तरीय ब्रेंचप्रेस स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेसला 10 पदकं

लोणावळा : महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन आणि औरंगाबाद पाॅवरलिफ्टींग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने छावणी औरंगाबाद येथील केशर लाॅन्स येथे नुकत्याच झालेल्या राज्य पातळीवरील बेंचप्रेस स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेस च्या खेळाडूंनी 4 सुवर्ण, 3 रौप्य तर 3 कांस्यपदक अशा 10 पदकांची कमाई करत शिवदुर्ग फिटनेस चा लौकिक कायम राखला आहे.

सुर्वण पदक विजेते : तपस्या अशोक मते (43 kg sub.Jr.), साक्षी संजय राऊत (69 kg Jr.सुवर्ण पदक), सुनिल सपकाळ (66 kg mast.1सुवर्ण पदक), इक्वीप्ड बेंचप्रेस स्पर्धेत ज्योती कंधारे (52 kg sr.सुवर्ण पदक)

रौप्य पदक विजेते : खुषी बडेला (47 kg sub.Jr.), ज्योती कंधारे (52 kg sr.), इक्वीप्ड बेंचप्रेस स्पर्धेत अशोक मते (83 kg mast)

कांस्य पदक विजेते : साई गायकवाड (53 kg sub.Jr.), गणेश पुजारी (74 kg mast), अशोक मते (83 kg mast).

 यासह पुणे जिल्ह्यासाठी 101 गुणांची कमाई देखिल केली. आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपला सहभाग निश्चित केला. वरील सर्व खेळाडू शिवदुर्ग फिटनेस येथे अशोक मते सर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत. त्याच्या या विजयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

इतर बातम्या