Breaking news

LONAVALA SEX RACKET : लोणावळा परिसरात सुरु असलेल्या एका सेक्स रॅकेटचा पोलिसांनी केला पर्दाफाश; एक जण ताब्यात - दोन मुलींची सुटका

लोणावळा : लोणावळा परिसरात सुरु असलेल्या एका सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या रॅकेटमधून दोन मुलीची सुटका करण्यात आली असून एका दलालास पोलिसांनी अटक केली आहे. वडगाव न्यायालयात त्याला हजर केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांनी दिली. दहशतवाद विरोधी पथक पुणे ग्रामीण आणि लोणावळा ग्रामीण पोलीसांनी बनावट ग्राहक पाठवून ही कारवाई केली आहे.

    जय उर्फ धनंजय कातवारू राजभर (वय 37, रा. नांगरगाव लोणावळा, मूळ राहणार- टिळक नगर, चेंबूर, मुंबई) असे अटक केल्याचे नाव आहे. आरोपी धनंजय हा लोणावळा येथील एका महिलेसोबत हे रॅकेट चालवण्याचे काम करतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार पोलीस त्या महिलेचा शोध घेत आहेत. तसेच यामध्ये आजुन कोणकोण सहभागी आहे, याचा शोध सुरु असून लवकरच सर्वजण गजाआड असतील असा विश्वास पोलीस निरीक्षक मोरे यांनी व्यक्त केला आहे.

     व्हॉट्सअपच्या माध्यमातून ग्राहकांना मुलींचे फोटो पाठवून दर ठरवून त्या मुलींना मोटारीतून लोणावळा परिसरातील ग्राहकांना पुरवले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

    मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहकाद्वारे जय उर्फ धनंजय यांच्याशी व्हॉट्सअपवर संपर्क साधला. त्याने व्हॉट्सअप वर वेश्याव्यवसायासाठी मुलींचे फोटो पाठवून दर ठरवल्यानंतर या मुलींना तो वरसोली, लोणावळा येथे घेऊन येतो, असे सांगितल्यानंतर पोलीसांनी सदर जागी सापळा रचला. त्यानंतर आरोपी हा मोटारीतून दोन मुली घेऊन तेथे आला. खात्री पटताच पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. दोन्ही मुली दिल्ली येथून वेश्या व्यवसायासाठी आणल्या होत्या. या मुलीची सुटका केली असून लोणावळा ग्रामीण पोलीस तपास करत आहेत.

    पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी लोणावळा राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश पवार, विश्वास खरात, पोलीस हवालदार ईश्वर जाधव, पोलीस नाईक विशाल भोरडे, किरण कुसाळकर, महेंद्र कोरवी, मोसिन शेख, लक्ष्मण राऊत व स्थानिक गुन्हे शाखेच्या सुजाता कदम, पुनम गुंड तसेच लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे युवराज बनसोडे, पुष्पा घुगे, सिद्धेश्वर शिंदे आदीच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

इतर बातम्या