Breaking news

Lonavala Rally : लोणावळा शहरात उद्या "हर घर तिरंगा" जनजागृती रॅली

लोणावळा : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना येणार्‍या 15 ऑगस्ट रोजी देशातील सर्व घरांवर तिरंगा पडकविण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. याकरिता हर घर तिरंगा अभियानाची जनजागृती करण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने शुक्रवारी (5 ऑगस्ट) रोजी सकाळी 10 वाजता "हर घर तिरंगा" जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. लोणावळा शहरातील सर्व शाळांचे विद्यार्थी या रॅलीत सहभागी होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मावळा पुतळा चौकातून सदर रॅली सुरु होईल व नगरपरिषद कार्यालयासमोर तीची सांगता होईल. रॅली मध्ये प्रत्येक शाळेने किमान 100 विद्यार्थी शालेय गणवेशात आणावे. शाळेच्या नावाचा फलक सोबत असावा. रॅली मध्ये हर घर तिरंगा या विषयावर देशभक्तीपर घोषणांचे फलक विद्यार्थ्यांच्या हातात असावे अशा सूचना लोणावळा नगरपरिषदेचे कडून देण्यात आल्या आहेत.

इतर बातम्या